बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

भोपाळ | उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या नव्या कायद्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात वाढती लोकसंख्या पाहता कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे. त्यातच आता भाजप खासदारने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे, हे देशाचं दुर्भाग्य आहे, असं वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी केलं आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता 2 मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही आहे. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भारताची एक इंचही जमीन वाढली नाही आणि लोकसंख्या 140 कोटीपर्यंत पोहोचलीय. ही गोष्ट शुभेच्छा देण्याची किंवा अभिनंदन करण्यासारखी नाही. भारताची फाळणी झाली होती, तेव्हा पाकिस्तानकडे जमीन जास्त गेली होती आणि कमी लोकसंख्या गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अभिनेता आमिर खानवर केलेल्या वक्तव्यामुळे आता सुधीर गुप्ता यांचं नाव देशभर गाजत आहे.

दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दिला आहे. योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याला शरद पवारांनी समर्थन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही- राहुल गांधी

शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More