बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे

मुंबई | आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

आज राजभवनात फक्त एकनाथ शिंदे हेच शपथ घेतील. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले जाणार असले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत.

संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

फडणवीस आणि शिंदेंच्या शपथविधीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

“महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील”

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला शपथ घेणार

“बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More