बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे”

मुंबई | अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या गुन्ह्याअंतर्गत उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेकांनी पुढे येत त्याला समर्थन दिलं आहे तर काहींनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. अशातच आता लोकप्रिय काॅमेडियन राजू श्रीवास्तवनंही राजच्या अटकेनंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राजू श्रीवास्तव यांनी राज कुंद्राच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राज कुंद्रासारखे लोक पैसे कमावण्यासाठी काहीही करु शकतात. अशा लोकांना देशाच्या संस्कृतीचं काही घेणंदेणं नसतं. अशा लोकांवर सोशल बाॅयकाॅट करण्याची गरज आहे. आजकाल वेब सीरिजमध्येही खूप अश्लीलता दाखवली जाते. मी या गोष्टींचा याआधीही विरोध केला आहे.

भोजपुरी चित्रपटांमध्येही खूप अश्लीलता दाखवली जाते. मी याविषयी आवाज उठवला आहे. तसेच योगी सरकारकडेही तक्रार केली आहे. यातच आता राज कुंद्राचंही हे घाणेरडं कृत्य समोर आलं. आपल्या घरी खूप पैसा आला पाहिजे एवढंचं त्यांचं उद्दिष्ट्य असतं. पैसे कमावण्यासाठी लोकं आपला धर्म, इमानदेखील विकायला तयार झाल्यासारखं वाटत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राजूनं दिली आहे.

दरम्यान, बाॅलिवूडमधील लाेक अशा प्रकरणांवर शांत राहतात. या लोकांनीही पुढे येऊन अश्लील गोष्टी करणाऱ्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे. कायदा तर आपलं काम करेल. मात्र सामाजिक स्वरुपात आपण यांचा बहिष्कार केला पाहिजे, असं मतही राजू यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More