बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…’; सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना झटका

मुंबई | मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना 100 कोटी रूपये द्यायला लावले असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं. देशमुखांची सीबीआय चौकशी चालू आहे. तर परमबीर सिंह यांच्याविरूद्ध देखील तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत देखील गुन्हे  दाखल आहेत. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

परमबीर सिंह त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंगांना कडक शब्दात फटकारलं आहे.

‘तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही तब्बल 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. मात्र आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे’, असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्या बँचसमोर हा सुनावणी चालू होती. तेव्हा न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत, असं म्हणत परमबीर सिंग यांना चांगलंच फटकारलं.

दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणांनी प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना मोठा झटका मानला जात आहे तर, महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणतं वळण घेईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

आषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’

‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More