बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी भाजप आणि आरएसएसवर टीका करताना दिसत असतात. आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीवर त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे. त्यातच आता राहुल गांधी यांनी पुन्हा भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केलाय.

आज अखिल भारतीय महिला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. हे लोक हिंदू नाहीत, हे फक्त धर्माचा वापर करतात, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

हिंदू धर्माचा पाया अहिंसा आहे. ज्यांनी हिंदू धर्म समजून घेतला आणि त्याचं आचरण केलं, ते खऱ्या अर्थाने महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींना आरएसएसच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या? तुम्हाला याचा विचार करावा लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, आरएसएस आणि भाजपचे लोक ‘महिला शक्ती’ दडपून देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. मोदी सरकारने लक्ष्मी शक्ती आणि दुर्गा शक्तींवर हल्ला केला आहे. ते स्वत:ला हिंदू पक्ष म्हणतात आणि माँ दुर्गावर हल्ले करतात. हे खरे हिंदू नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More