नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ऑफिसमध्ये होणारे काम आता लोक घरी बसून करत आहे. सध्या कोरोनाची चिंता सर्वांनाच सतावत आहे. त्यातच लोक घरी बसून गुगलवर कोरोनासंदर्भात माहिती पाहत आहे, असं एका अहवालातून समोर आलं आहे.
भारतात लोक कोरोनाच्या लसीबाबत सर्वात जास्त चिंतेत आहे. गुगलच्या सर्च अहवालातून ही बाब समोर आली आहे. सर्वात जास्त सर्च होणारा विषय हा कोरोना आहे. यातील जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची लसीबाबत सर्च केलं आहे.
गुगलवर जुलै महिन्यात ‘घरातच कोरोना लस कशी बनवावी ?’ हे सर्वात जास्त सर्च झालं आहे. यानंतर कोरोनासंदर्भातील ‘अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह’ हे 5 हजारपेक्षा अधिक लोकांनी सर्च केलं आहे. गुगलच्या अहवालानुसार, 5 हजारपेक्षा अधिक लोकांनी ‘कोरोना कवच पॉलिसी’ आणि 3 हजार 300 पेक्षा अधिक लोकांनी ‘कोरोना रक्षक पॉलिसी’ हे सर्वात जास्त सर्च केलं आहे. तसेच लोकांनी ऐश्वर्या राय कोरोना विषाणू हे ही सर्च केलं आहे.
मार्च महिन्यात लोकांनी कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्च केलं होतं. कोरोना विषाणूची लक्षणे हा सर्वात जास्त सर्च झालेला विषय आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये याचे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढले. सर्वात जास्त सिक्कीम राज्यातील लोकांनी हे सर्च केलं आहे, त्यानंतर अंदमान निकोबार बेटातील समूहाने कोरोनासंदर्भात सर्च केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ मुलाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च पार्थ पवारांनी उचलला; सोबतच दिली कौतुकाची थाप!
“…आता कसे थंड पडले आहेत बघा, ही नकली शिवभक्ती काय कामाची”
‘एका तासाच्या आत मोदींना ठार करेन’, एका फोन कॉलनं बसला पोलिसांना हादरा अन्…
आश्चर्यम! ‘या’ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी आता घेतलं अकरावीत अॅडमीशन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Comments are closed.