Top News देश

…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!

Loading...

हैद्राबाद | कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कठोर इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

Loading...

लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे.

“राज्यातील नागरिकांनी राज्याबाहेर जाऊ नये. तसेच कुणीही रस्त्यावर उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर 100 नंबरवर कॉल करा. पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला मदत करतील. नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करा, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“लोकांनो घाबरू नका, गडबड गोंधळ करू नका; भाजीपाला, किराणा दुकाने तसंच मेडिकल सुरू राहणार”

लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे; जयंत पाटलांची मोदींवर सडकून टीका

महत्वाच्या बातम्या-

बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये म्हणून गावकऱ्यांची नामी शक्कल

पोलिसांनी तेल लावून लाठी वापरावी- अनिल देशमुख

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक आणि टेम्पोंबाबत सरकारने घेतला हा निर्णय

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या