मुंबई | सध्या राज्यात सगळीकडं ग्रामपंचायत निवडणुकीच वारं घुमत आहे. यावरुनच माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात चांगलीच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत शिंदेंनी गेल्या दहा वर्षांत मी कधीही कोणाला दमदाटी केलेली नाही. उलट मी गृहराज्यमंत्री होतो तेव्हा लोकच मला कामासाठी दमदाटी करायचे. त्यामुळे मी आता कोणाला दमदाटी करण्याचा प्रश्नच नाही,अशा शब्दात रोहित पवारांना जोरदार टोला लगावला आहे. कर्जतच्या जोगेश्वरवाडी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पवार यांनी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यावर टीका करताना शिंदे यांनी हे प्रलोभन असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर बोलताना पवार यांनी कार्यकर्त्यांना होणारी दमबाजी खपवून घेणार नाही. आपणही सामाजिक गुंड आहोत, असं उत्तर दिलं होतं.
शिंदे म्हणाले की, “आपल्यासमोर लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी कसेही बोलले तरी चालते. आपण कधीही कोणाला दमदाटी करत नाही. शेवटी लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचं असतंं. सत्तर वर्षांत आपल्या लोकांना काही मिळालं नाही. त्यामुळं आपली कामं करुन घेण्यासाठी लोक भांडली तर यात मला काहीच गैर वाटत नाही.”
थोडक्यात बातम्या-
मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???
‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!
त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!