देश

“सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं”

नवी दिल्ली | रकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

कन्हैया कुमार, शेहला राशिद आणि उमर खालिद सारख्या युवा नेत्यांसोबत शत्रूप्रमाणे व्यवहार केला जात आहे. शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी द्यायला हवी होती मात्र दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात आहे, असं देखील अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं तसेच त्यांना जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देखील अमर्त्य सेन यांनी समर्थन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”

चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!

“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या