भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे
मुंबई | मंगळवेढा- पंढरपूरचे स्व. आमदार भारत भालके यांच्या आकस्मात जाण्याने या मतदारसंघाची पोटनिवडणुक होणार आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीने शब्द दिल्याप्रमाणे भारत नाना यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.
भगीरथ भालकेंना उमेदवारी जाहीर होण्याअगोदर मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघांसाठी अनेक नेत्यांची नाव चर्चेत होती. यामध्ये भगीरथ भालके आणि नानांच्या पत्नी जयश्री भालके यांच्यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होेते. भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केल्यावर राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा चे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतनानांवर प्रेम करणारी पंढरपूर-मंगळवेढा ची जनता भगीरथ यांनाही विजयी करणार हा विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुळे यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे. तर भाजपनेही आपला उमेेदवार जाहीर केला आहे. भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघांसाठी समाधान अवताडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा चे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी @NCPspeaks चे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.भारतनानांवर प्रेम करणारी पंढरपूर-मंगळवेढा ची जनता भगीरथ यांनाही विजयी करणार हा विश्वास आहे. https://t.co/645jGm057z
— Supriya Sule (@supriya_sule) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशमधील वातावरण खवळलं
राष्ट्रवादीने शब्द पाळला! राष्ट्रवादीकडून नानांच्या वारसदारालाच उमेदवारी जाहीर
“दुकानं बंद करण्यास अजून एक तास वाढवून देण्यात यावा”
रितेश आणि त्याच्या परिवाराकडून दिलेल्या होळीच्या शुभेच्छांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.