बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

मुंबई | तालिबाननं काबूलवर वर्चस्व मिळवल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अशातच आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या  वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जावेद अख्तर यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या प्रश्नावरुन काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. यामध्ये त्यांनी तालिबानी हे रानटी प्रवृत्ती असल्याचं म्हणत तालिबानवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांवर देखील टीका केली आहे.

तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदानीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जावेद अख्तर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जावेद यांनी भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतात. काही असेही लोक आहेत जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, असंही यावेळी जावेद अख्तरनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

तब्बल 21 हजार वर्षापूर्वीही होतं कोरोनाचं अस्तित्व; ऑक्सफोर्डच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

उच्चशिक्षित दाम्पत्यावर आली आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याची वेळ; पाहा नेमकं कारण काय

भारताचं पदक निश्चित! प्रमोद भगतची फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; तब्बल 200 कोटी हडपण्याचा रचला कट

निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? ‘या’ दोन राज्यात सत्ता बदलाची शक्यता!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More