बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात अतिदिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोना लस; प्रशासनाचा स्तुत्य निर्णय

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक लसीकरण केलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राने विक्रम नोंद केलेला आहे. त्यातच आता लसींअभावी अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तर राज्यातील 18 वर्षांच्यावरील सर्वांचं लसीकरण तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलं आहे.

कोरोना लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. तसेच दिव्यांग व्यक्तींनाही रांगेत उभं राहावं लागत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन लसीकरण मोहिमेत दिव्यांग व्यक्तींना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली.

दरम्यान, पुजारी यांनी आयुक्तांची भेट घेऊन अतिदिव्यांग व्यक्तींना घरीच लस देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्याबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग लावण्यासंदर्भातही मागणी केली होती. महानगरपालिका आयुक्तांनी पुजारी यांची मागणी तात्काळ मान्य करत अतिदिव्यांग व्यक्तींना आता इथून पुढे घरीच लस देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील अतिदिव्यांग व्यक्तींना आता घरीच कोरोना लस देण्यात येणार आहे. त्याबरोबरच दिव्यांग व्यक्तींना आता लसीकरण केंद्रावर आठवड्याचे सातही दिवस वेगळी रांग असणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना लसीकरणात येणाऱ्या अडचणी कमी झाल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर

“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य

दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More