बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

नवी दिल्ली | कोव्हिड-19 रोगाने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर बाकीच्या जगाला या रोगाबद्दल माहिती झाली. तोपर्यंत हा रोग नक्की काय आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. हळूहळू जसाजसा रोग पसरू लागला तसातसा याची माहिती होत गेली. पुढे कोरोनावर संशोधन होऊ लागलं. त्यामुळे कोरोना हाताळण्यास डाॅक्टरांना सोपं होऊ लागलं. आता अशीच एक माहिती CSIR चा संशोधनातून समोर आली आहे.

AB आणि B रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचा धक्कादायक CSIR म्हणजेच ने खुलासा केला आहे. त्यांच्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे. तर ‘O’ रक्तगटावर कोरोनाचा कमी परिणाम दिसून येत आहे. त्याचबरोबर मांसाहारी लोकांवर कोरोनाचा धोका अधिक दिसून येत आहे, असं सीएसआयआरच्या संशोधनातून समोर आलं आहे.

मांसाहार करणाऱ्यांना शाकाहारींच्या तुलनेत संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. 10 हजार नागरिकांच्या सर्वेतून ही माहिती समोर आली आहे. एक दोन नव्हे तर 140 डाॅक्टरांच्या पथकाकडून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना झाल्यावर रूग्णांना जास्त करून मांसाहारी पदार्थ दिले जातात. मांसाहार घेतल्यानं जास्त प्रथिने भेटतात. त्यामुळे मांसाहार दिला जात होता. परंतू, आता संशोधनावर आयसीएमआरला योग्य ती पावलं उचलावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीने केली आत्महत्या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास

महाराष्ट्रात लाॅकडाऊनमध्ये 1 जूनपर्यत वाढ ‘ही’ आहे नवी नियमावली 

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

सलग पाच वर्ष विराट कोहली अँड टीमनं केला नवा विक्रम; मात्र, न्यूझीलंडकडून धोका

अजित पवारांना ‘या’साठी हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी त्यासाठी करणार इतके कोटी खर्च

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More