मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावर केंद्र सरकारने SC आणि OBC बजेट एकत्र सादर करून या समूहात भांडण लावण्याचं काम केलं असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सरकारने आज मांडलेलं बजेट अत्यंत निराशाजनक आहे. देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग सरकारने काढला नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
SCचं बजेट स्वतंत्र असावं अशी संविधानाचत तरतूद आहे. मात्र अर्थसंकल्पात सरकारने SC आणि OBC बजेट एकत्र सादर करून या समूहाचे हक्क नाकारून भांडण लावण्याचं काम केलं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणारा आहे, असं म्हणत भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.
सरकारने आज मांडलेलं बजेट अत्यंत निराशाजनक आहे.देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग सरकारने काढला नाहीये.SCचं बजेट स्वतंत्र असावं अशी संविधानात तरतूद आहे मात्र सरकारने SC,OBC बजेट एकत्र सादर करून या समूहाचे हक्क नाकारून,भांडण लावण्याचे काम केलंय. pic.twitter.com/uf8I4Wza4v
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!
‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य
महत्वाच्या बातम्या-
फडणवीस सरकारने रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचे धक्कादायक आकडे उघड
महाबळेश्वरसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय
आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर
Comments are closed.