Top News अहमदनगर महाराष्ट्र

पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?

अहमदनगर | आज राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाला लागला आहे. यामध्ये हिवरे बाजार, पोटोदा आणि राळेगणसिद्धीतील निकालावर राज्याचं लक्ष लागलेलं होतं.

हिवरे बाजार येथे पोपटरावांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे तर पाटोद्यात भास्करराव पेरे-पाटलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुलीचा म्हणजे अनुराधा पाटील यांचा पराभव झाला आहे.

राळेगणसिद्धीमध्ये अण्णांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्या आहेत. राळेगणसिद्धीत हजारे यांचे निकटवर्तीय माजी स्वीय सहायक अशा मंडळींनी एकत्र येत स्थापन केलेल्या ग्रामविकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, अनिल मापारी, लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे यांच्या पॅनलने सत्ता राखली आहे. विरोधकांनी उभ्या केलेल्या शामबाबा पॅनलचा सपशेल पराभव झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

आरोपांनंतरही धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार

…म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती- नारायण राणे

‘या’ गावात रामदास आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड!

कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या