पुणे महाराष्ट्र

सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

पुणे | डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासानंतर सनातन संस्थेसह उपसंस्थांशी संबंधित असलेले आरोपी सापडले आहेत. अशा सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरूपी बंदी घाला, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

या आरोपींच्या विरोधात कारवाईस पाच वर्षांचा विलंब का लागला? कुठेतरी भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारकडून यांना राजाश्रय तर दिला जात नाही ना?, अशी शंका येत आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नाशिक, मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी जसे सुटले तसे हे सुटू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

-सचिने अंदुरेचे तीन मित्र ताब्यात; औरंगाबादमध्ये एटीएसची कारवाई

-शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या