बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

मुंबई | राज्यातील हॉटेल चालकांबाबत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व हॉटेल चालकांना रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

हॉटेलला रात्री दहावाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी हॉटेल चालकांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये जे लोक जेवणासाठी आले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

जेवणासाठी आलेल्या लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास सांगितलं आहे. त्याप्रमाणेच सर्वांची बसण्याची व्यवस्थाही तशा प्रकारेच केलेली असावी. हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असायला हवेत.

दरम्यान, रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळ अद्यापही बंद आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

“मंत्रालयातील सर्व बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या, त्यामुळे…”; निलेश राणेंची जहरी टीका

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More