बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विठ्ठलाची महापूजा करता येणार नाही!

पंढरपूर | आठवड्याभरापूर्वी मविआ सरकार टिकणार की पडणार?, विठ्ठलाची पूजा तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार? की नवा मुख्यमंत्री करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर हा पेच सुटला आहे. कारण राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मात्र आता एक नवीन पेच निर्माण झाला आहे.

राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोग कोणत्या कार्यक्रमांना परवानगी देणार, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून आहे.

आषाढी एकादशीसाठी उद्या मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. आयोगाने ही परवानगी दिल्यावर त्यांना विठ्ठल पूजेसाठी जाता येणार आहे. विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा संपन्न होणार आहे. पहाटे शासकीय पूजा आटोपून इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयोग नेमक्या कोणत्या कार्यक्रमांना परवानगी देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु मु्ख्यमंत्र्यांना या पुजेची परवानगी मिळेल, अशी आशा आहे.

थोजक्यात बातम्या – 

“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”

मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता

आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More