बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर शाळेची घंटा वाजणार! उद्यापासून राज्याच्या ‘या’ भागातील शाळा सुरू

मुंबई | गत दीड वर्षांपासून राज्यातील शाळा (Schools) बंद आहेत. सरकार (Government) आणि विद्यार्थी (Student) यांची दोन्हीची शाळा सुरू करण्याची इच्छा असूनही कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्या आल्या होत्या. सरकारनं आता शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासनानं त्यांच्या इच्छेनूसार शाळा सुरू करण्याबाबत कारवाई करण्याचं ठरवलं आहे.

ग्रामीण भागात काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्यावर स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय असल्याचं दिसत नाही. पण आता राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे येथील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश स्थानिक प्रशासनानं जारी केले आहेत.

पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील शाळा 16 डिसेंबरपासून ( 16 December) सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ठाणे शहरातील शाळा उद्या म्हणजेच 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शाळा सुरू करण्याचे जाहीर केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं राज्यभरातील शाळा सुरू करण्याचं घोषणा केली होती. पण अचानक ओमिक्राॅनचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्यानं शाळांबाबत निर्णय मागं घेण्यात आला होता. पण किती दिवस शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचं नुकसान करणार हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहील्यानं सरकारनं परत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या 

भारतीय सैन्याला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा खात्मा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महागाईने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली

दिल्लीत नेमकं शिजतंय काय? शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More