बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 11 वर्षांची नताशा ठरली जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी

वॉशिंग्टन | भारतीय वंशाच्या आणखी एका विद्यार्थिनीने भारताच्या मानपेचात मोलाचा तुरा रोवला आहे. भारतीय वंशाची असणाऱ्या नताशा पेरी या विद्यार्थिनीने जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून किताब मिळवला आहे. जगातील सर्वात हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी जॉन हापकिन्स सेंटरतर्फे एक स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये नताशा पेरी अव्वल ठरली आहे.

जॉन हापकिन्स सेंटरतर्फे घेण्यात आलेल्या SAT आणि ACT या परीक्षांमध्ये नताशाने उत्तम कामगिरी केली आहे. न्यूजर्सी येथील थेल्मा एल सॅंडमीयर एलिमेंटरी या शाळेमध्ये नताशा शिक्षण घेत आहे. नताशा अवघ्या 11 वर्षांची आहे. नताशाने पाचवीमध्ये असताना ही परीक्षा दिली होती.

जगातील 84 देशातील जवळपास 19 हजार विद्यार्थी या परीक्षेत सामील झाले होते. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्यांचा विविध चाचण्या घेत शोध घेतला गेला. या चाचण्यांमध्ये नताशाला 90 टक्के गुण प्राप्त झाले. 90 टक्के गुणांसह या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवत नताशा जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली आहे.

दरम्यान, नताशाच्या या यशानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नताशाचं अभिनंदन केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

भररस्त्यात तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा! गाडी चालकाच्या कानाखाली लगावत…; पाहा व्हिडीओ

“भगतसिंह कोश्यारींना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More