नवी दिल्ली | मुंबईजवळच्या अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची महाराष्ट्र सरकारची योजना ही आणि बेकायदा वायफळ असल्याने ती रद्द करावी, अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
समुद्रात होणााऱ्या या स्मारकामुळे पर्यावरणाची भरून न काढता येणारी अशी अपरिमित हानी होणार आहे. पर्यावरणाची हानी होणे हे गंभीर आहे, असा मुद्दा अॅड. भट्टाचार्य यांनी मांडला आहे.
दरम्यान, या स्मारकास दररोज 10 हजार पर्यटक भेट देतील व गर्दीच्या वेळी ही संख्या तासाला चार हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे शहराच्या त्या भागात आधीच असलेली वाहतूक समस्या आणखीनच बिकट होईल, असा मुद्दा याचिकेत नमूद केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जास्त हाॅर्न वाजवा, जास्त वाट पाहा; मुंबई पोलिसांची भन्नाट युक्ती.. पाहा व्हिडीओ
प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी- सुप्रिया सुळे
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.