बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा”

मुंबई | साधारण दीड वर्षापुर्वी आलेल्या कोरोनाने जगभर थैमान घातलं. या कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी देशभरातून निधी जमा करण्यात आला. हा निधी जमा करण्यासाठी पीएम केअर फंडची सुरूवात करण्यात आली होती.पण या पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावरून नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यासाठी सरकारला थेट नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठाण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विक्रांत चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पीएम केअर फंडच्या अधिकृत संकेतस्थळावरून पंतप्रधान मोदींचा फोटो, त्यांचं नाव, राष्ट्रध्वज आणि सोबतच देशाचे बोधचिन्ह हटवण्याची देखील मागणी केली आहे. विक्रांत चव्हाण यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

पीएम केअर फंड पूर्णपणे स्वतंत्र आहे. यात कोणतंही सरकारी काम केलं जात नाही. न्यासाचा निधी हा केंद्र सरकारच्या मालकीचा नाही. न्यासाकडे गोळा होणारा निधी हा देशाच्या एकत्रित निधीत जात नाही. त्यामुळे या स्थितीत न्यासाच्या नावात पंतप्रधान शब्दाचा वापर चुकीचा असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

न्यासाच्या नावात पंतप्रधान शब्दाचा वापर, अधिकृत संकेतस्थळावर पंतप्रधानांचे छायाचित्र प्रसिद्ध करणे, देशाचे बोधचिन्ह, राष्ट्रध्वज याचा वापरामुळे संविधानातील बोधचिन्ह आणि नावांचा अयोग्य वापर प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्यामुळे ते तातडीने हटवले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेशही सरकारला देण्यात आले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More