मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

मुंबई | मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे.

एखाद्या समाजाला 16 टक्के आरक्षण देणं संविधानाच्या विरोधात असून आरक्षण 50 टक्क्यांच्या वर देणं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग असल्याचं अॅड. गुणरतन सदावर्तेंनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल होण्याची शक्यता असल्याने विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात तर सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. 

दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणावर अध्यादेश काढला आहे, त्यामुळे मराठा आरक्षण लागू झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!