Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”

मुंबई | काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सोशल मिडियावरुन बदनामी करण्यात आली होती. त्याच बदनामी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयानी चांगलंच धारेवर घेतलं. ‘प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यासंदर्भात कोणतेही आक्षेपार्ह ट्विट न करण्याची तुमच्या आशिलाना समज द्या’, अशा शब्दांत हायकोर्टाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना सुनावलं.

12 जानेवारीपर्यंत याचिकाकर्त्याविरोधात कोणतीही कारवाई किंवा आरोपपत्र दाखल न करण्याच्या सूचनाही खंडपीठाने पोलिसांना दिल्या आहेत. 25 ते 28 जुलैदरम्यान नवी मुंबईतील रहिवासी सुनैना होली यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह व बदनामी करणारे व्यंगचित्र अपलोड केले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत तीन गुन्हे दाखल केले आहेत.

आरोपी महिलेने हायकोर्टात ऍड.अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत एफआयआर रद्द करण्यात यावे तसेच अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.

दरम्यान, सरकारच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ काऊन्सिल मनोज मोहिते तसेच सरकारी वकील जयेश याग्निक यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला किमान खटला निकाली निघत नाही तोपर्यंत तरी याबाबत सोशल मीडियावर ट्विट करण्यापासून याचिकाकर्त्याना रोखावे अशी मागणी केली.याला आक्षेप घेत अशा प्रकारे एखाद्याला सोशल मीडियावर ट्विट करण्यापासून परावृत्त केल्यास त्याच्या स्वतंत्र्यावर बाधा आणल्यासारखे होईल,असं ऍड. चंद्रचूड यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

पहिल्या टप्यात राज्यातील ‘इतक्या’ जनतेला लस देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

केंद्र सरकारने कृषी कायद्यांना तूर्त स्थगिती द्यावी! समिती स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाची तयारी

…म्हणून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे

‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या