बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?

नवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ होत आहे. इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे. याविषयी विरोधक देखील आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर समाजातून सडकून टीका केली जात आहे. मात्र आता जनतेला यातून दिलासा मिळू शकेल असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.

1 जुलै 2017 पासून देशात जीएसटी लागू करण्यात आला होता. मात्र पेट्रोलियम उत्पादनावरील टॅक्स हा सरकारसाठी महसूलाचा एक महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लागू करण्यात आला नव्हता. आता पेट्रोलियम उत्पादनांवरही जीएसटी लावण्याचा विचार सरकार करत आहे, असं केल्यास संपुर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती समान राहतील, शिवाय जीएसट मध्ये कमी स्लॅबचा पर्याय निवडल्यास किंमत कमी होण्याची देखील शक्यता आहे.

भारतात सध्या जीएसटीमध्ये  5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के, आणि 28 टक्के असे प्राथमिक दर आहेत. यामधील जीएसटीचा सर्वाधिक दर जरी पेट्रोलियम उत्पादनांना लागू केला तरी पेट्रोलचे दर कमी होऊन निम्म्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार यावर्षी 2,37,338 कोटी रुपये पेट्रोलियम क्षेत्रातून सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामधील 1,53,281 कोटी रुपये इतका वाटा केंद्र सरकारचा, तर, 84,057 कोटी रुपये इतका वाटा राज्य सरकारचा होता. 2019-20 सालामध्ये हेच योगदान एकुण 5,55,370 कोटींचे होते. तर केंद्रिय अर्थसंकल्पानुसार 2021-22 या वर्षात पेट्रोलियम क्षेत्रातून एकुण 3.46 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांचा पाय खोलात, पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल

त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!

आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!

महाविकास आघाडीला मोठा धक्का, ‘या’ पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी?

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More