बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईचा फटका, पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर अनेक देश महागाईचा सामना करत आहे. या युद्धाचा थेट फटका जागतिक बाजारपेठेला बसला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचा ताण आधीच वाढला असताना पेट्रोल (Petrol) व डिझेलच्या (Diesel) दरात आज चौथ्यांदा वाढ झाली आहे.

या आठवड्यात मंगळवारी तब्बल साडे चार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर एकाच आठवड्यात चार वेळेस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने नागरिकांना मोठा झटका बसला आहे. या आठवड्यात नागरिकांना एक दिवस दिलासा दिल्यानंतर तेल कंपन्यांनी आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

शुक्रवारच्या तुलनेत मुंबईत (Mumbai) पेट्रोलच्या दरात 84 पैशांनी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 112.51 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर राजधानी दिल्लीत (Delhi) प्रतिलीटर पेट्रोलसाठी 97.81 रूपये मोजावे लागत आहेत.

दरम्यान, गेल्या साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर पाच दिवसात चौथ्यांदा वधारले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर या आठवड्याच्या सुरूवातीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले होते.

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल

मोठी बातमी! प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा झटका

“युक्रेनने नाटो ऐवजी आमच्या मुख्यमंत्री ठाकरेंकडेच मदत मागायला हवी होती”

‘मी राज्यात मंत्री असतो तर मुंबईत…’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

“ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More