बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली | केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर केल्यानेे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशात आज सकाळीच पेट्रोल- डिझेलचे नवीन दर जाहीर झालेले आहेत. या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही कोणताच फरक झाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहिर केलेल्या दरांनुसार सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 104. 01 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईमध्ये सध्या पेट्रोल 109. 96 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.13 रुपये प्रतिलिटर आहे. सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच पेट्रोलवरी कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोलचा दर कमी झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता भाजपकडून राज्य सरकारनेही इंधनावरील कर कमी करावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही सध्या याच मुद्द्यावरून राजकारण पेटलेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारचाही यासंदर्भात विचार सुरू असून लवकरच महाराष्ट्रातही इंधनावरील कर कमी केला जाऊ शकतो. राज्य सरकारनेही करकपात केली तर पेट्रोलची किंमत 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार बैठक घेणार असून निर्णय घेतील.

थोडक्यात बातम्या-

“भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय”

“…तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल”

SIT चौकशी दरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती आली समोर!

मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More