बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) थेट फटका आंततरराष्ट्रीय बाजाराला बसला आहे. अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Hike) वाढ झाल्याने नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यात तब्बल साडेचार महिन्यांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.

पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 83 पैशांनी महागलं आहे. मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol) 110.82 रूपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत प्रतिलीटर डिझेलचा (Diesel) दर 94.14 रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

दरम्यान, 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्यांना झटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

“वहिनीसाहेबांचा आग्रह असेल तर तो आग्रह आम्ही पाळू”

“उरलेले दोन तास सुद्धा मोदींना झोपू द्यायचं हे नाही त्यांनी ठरवलंय”

जो बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाची नाराजी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More