बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री मात्र कायम

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलचे दर आता तरी स्थिर राहतील असं वाटत असताना पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा उचल खाल्ली आहे. महागाई आधीच गगनाला भिडली असताना, पेट्रोल-डिझेलच्या दरात सततची वाढ सर्वसामान्यांचा ताण वाढवत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहिर केले. यानुसार पेट्रोलच्या किंमतीत 34 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत 73 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आता 1 लिटर पेट्रोलसाठी 110.75 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा नवा दर 101.40 रूपये प्रति लिटर इतका आहे. तर पॉवरचा दर सध्या 114.69 रूपये प्रति लिटर आहे.

दरवाढ झाल्यानंतर पुण्यात प्रति लिटर पेट्रोलसाठी 110.50 रूपये मोजावे लागत आहेत. तर पुण्यात डिझेलची किंमत 99.60 रूपये प्रति लिटर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 104.79 रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.52 रूपये प्रति लिटर इतका आहे. सततच्या दरवाढीमुळे इंधनाच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महागल्या होत्या. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

इंधन दरवाढीचा एसटी महामंडळालाही फटका, एसटीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सोमय्यांच्या ‘त्या’ संतापावर सचिन सावंत म्हणतात, दुखत्या नसेवर बोट ठेवल्यास…

“एनसीबीची आणखी एक पोलखोल”; नवाब मलिक आज घेणार पत्रकार परिषद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More