सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; वाचा ताजे दर
मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) थेट फटका आंतरराष्ट्रीय बाजाराला बसला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात महागाई गगनाला भिडली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागलेली असताना देशात तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतीत वाढ झाली आहे.
मंगळवारी तब्बल साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर एकाच आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. नागरिकांना एक दिवस दिलासा दिल्यानंतर तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू केले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी देशातील चार मोठ्या शहरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात 80 पैशांनी वाढ केली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 112.51 रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत प्रतिलीटर डिझेलचे दर 92.22 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असलेले पाहायला मिळाले. त्यानंतर एकाच आठवड्यात तीन वेळेस पेट्रोल-डिझेलचे दर वधारले. या आठवड्यात तीन वेळेस दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल सरासरी 2.40 रूपयांनी महागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”
“The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका”
मोठी बातमी! PM Kisan योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल
“ठाकरे सरकार म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा”
परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका
Comments are closed.