बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना, ऐन सणासुदीत सर्वसामान्य नागरिक त्रस्त

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लक्षणीय वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आतापर्यंतच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वोच्च उच्चांक गाठला आहे.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असतानाच ऐन सणासुदीतही सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वी एक दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली नव्हती. पण गेले काही दिवस सतत पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

इंधनाचे दर गगनाला भिडत असताना आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ करण्यात आल्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. मुंबईत आज पेट्रोल 114.14 रुपये प्रति लिटर दराने विक्री करण्यात येत आहे. तर डिझेलचा दर हा 105.12 रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे.

सलग इंधनाचे दर वाढत असल्याने आता सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी काय प्रयत्न करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण गेल्या काही दिवसात वाढणाऱ्य़ा इंधनाच्या दरामुळे मात्र सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

आता बेडवर पडून निवांत झोप काढण्याचेही मिळणार लाखो रुपये

“स्वत:चे घोटाळे दाबण्यासाठी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रीक आहे”

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

“एका ट्विटवरून गुन्हा दाखल करणारे सन्माननीय मुख्यमंत्री आता गप्प का?”

“कोणतेही दाखले काढायचे असल्यास काढून मिळतील- नवाब मलिक झेराॅक्स सेंटर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More