बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

मुंबई | संपुर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आकाश गाठलं असताना सर्वसामान्य माणूस मेताकुटीला आला आहे. गेल्या काही दिवसात या इंधनाचे दर हे चढत्या क्रमात वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज इंधनांच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना आज पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

इंधनाचे वाढते दर हा चिंतेचा विषय बनला असताना सोमवारीदेखील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तर आजही कंपन्यांनी तोच निर्णय लागू राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलचा दर हा स्थिर असणार आहे. पण सध्या डिझेलनेही शंभरी पार केली असताना इंधनाच्या दरवाढीला कधी ब्रेक लागणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच पेट्रोलच्या दरात 3 रुपयांहून अधिक प्रति लिटर वाढ करण्यात आली तसेच डिझेलच्या दरात जवळपास 4 रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर हा 111.17 रुपये प्रति लिटर असून डिझेलने शंभरी गाठत 102.52 रूपये प्रति लिटर एवढा विक्रमी टप्पा गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात इंधन दरवाढीने मात्र कळस गाठला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या इंधनाचे दर वाढल्याने एकूणच परिस्थिती ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून महागाई देखील वाढत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरही महागाई कमी करण्यात येत नसल्याने सरकारविरोधात नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटताना पाहायला मिळत आहे. तसेच सरकार आता ही दरवाढ रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

राज्यातील कॉलेज उद्यापासून सुरू, मात्र या नियमांचं करावं लागणार पालन, वाचा सविस्तर

“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”

शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव

रिझर्व बँकेची एसबीआयवर मोठी कारवाई, ठोठावला तब्बल एवढा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More