बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

देशात महागाईने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असतानाच इंधन दरवाढीने आणखी चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये सध्या 102.82 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर असून डिझेल 94.80 रुपये प्रति लिटर एवढा आहे. मे महिन्यापासुन पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरांमध्ये 24 वेळा वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात परभणीत सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 105 रुपये 80 पैसे प्रति लिटर डिझेल 95 रुपये 66 पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्याने नागरिकांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असताना भारतात इंधन दरवाढ सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या भारतातील इंधन दरवाढ आटोक्यात आणून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण

भारताची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More