नवी दिल्ली | जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी भारतात इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असताना पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
गेल्या 14 दिवसांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात 12 वेळेस वाढ झाली आहे. तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले असून सोमवारी प्रतिलीटर पेट्रोल-डिझेलच्या दरात 40 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. हे दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलचे दर 117.57 रूपये झाले आहेत. तर प्रतिलीटर डिझेलची किंमत 101.79 रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) प्रतिलीटर पेट्रोलसाठी 103.41 तर प्रतिलीटर डिझेलसाठी 94.67 रूपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, साडेचार महिने स्थिर राहिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात 22 मार्चपासून सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 14 दिवसात पेट्रोलच्या दरात तब्बल 8 रूपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरातही साधारण तेवढीच वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG च्या दरातही वाढ; वाचा आजचे दर
राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन जाहीर
‘अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’; सुजात आंबेडकरांचं खुलं आव्हान
‘देवेंद्र भाऊ तुम्ही अॅडजस्ट करून घेतलं तर…’, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला
Comments are closed.