मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाने गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरात उच्चांकी वाढ झालेली असताना देशात 106 दिवसांपासून इंधनाचे दर मात्र स्थिर आहेत. (Petrol Diesel Price)
मुंबईत पेट्रोलचे किंमत 109.98 रूपये प्रति लिटर आहे तर प्रति लिटर डिझेलसाठी 94.14 रूपये मोजावे लागत आहेत. ठाण्यात पेट्रोलचे दर 110.12 रूपये प्रति लिटर तर डिझेल 94.28 रूपये प्रति लिटर आहेत. पुण्यात प्रति लिटर पेट्रोलचा भाव 109.52 रूपये तर प्रति लिटर डिझेलचा भाव 92.31 रूपये आहे.
नाशिक शहरात प्रति लिटर पेट्रोलसाठी 110.40 रूपये, प्रति लिटर डिझेलसाठी 93.16, नागपूरात प्रति लिटर पेट्रोलसाठी 95.27 रूपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 86.21 रूपये, अहमदनगरमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी 109.55 रूपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 92.35 रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अनेक राज्यात पेट्रोलचे दर 100 रूपयांच्या खाली आणले. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अजूनही शंभरी पारच आहेत.
थोडक्यात बातम्या-
शिवजयंती उत्सवाबाबत उद्धव ठाकरेंचे महत्वाचे निर्देश, पाहा काय आहे नियमावली?
“संजय राऊतांचा हेतू संशयास्पद, त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?”
सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
राणे-शिवसेना वाद टोकाला! नारायण राणेंचा ‘अधिष’ महापालिकेच्या रडारवर
Comments are closed.