बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा; इंधन दरवाढीला ब्रेक!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ऐन दिवाळीत इंधन दरवाढीतून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वजण मेटाकुटीला आले होते.

बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजच्या दिवस न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर 115.83 रुपये एवढा आहे. तर डिझेलसाठी 106. 59 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले नव्हते. परंतु, आता गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दर सतत वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच असल्याचं दिसून येत आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू करण्यात येतात. त्यानुसार आज पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सततच्या इंधन दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

“चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत”

“खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग…”

“…म्हणून नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा”

“उद्धवजी राजीनामा द्या आणि सरकार बरखास्त करा…”

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला! दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More