बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कच्च्या तेलाच्या दरात घसरण पण पेट्रोल आणि डिझेलचे दर…

नवी दिल्ली |  देशात काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेलचे दर आता तरी स्थिर राहतील, असं वाटत असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महागाई आधीच गगनाला भिडली आहे आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची सततची वाढ सर्वसामान्यांचा ताण वाढवत आहे.

जगभरात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. असं असलं तरी  पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र इंधनाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची सुट देण्याचा किंवा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. यानुसार पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आता 1 लिटर पेट्रोलसाठी 113.08 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा नवा दर 103.97 रूपये प्रति लिटर इतका आहे.

कच्च्या तेलाचा दर हा प्रति बॅरल 86 डाॅलर्सपर्यंत पोहोचला होता. त्यातच आता किंमतीत घट होऊन प्रति बॅरल 85 डाॅलर्सपर्यंत खाली आला आहे. पण अद्यापही इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय किंवा पावलं उचलताना सरकार दिसत नसल्याचं सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटताना पाहायला मिळत आहे. सततच्या दरवाढीमुळे इंधनाच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी 6 वाजता बदलून नवे दर लागू होत असतात. गेल्या 4 दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे. त्यामुळे हे चढते दर आता कधी नियंत्रणात येणार?,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

गौतम गंभीर म्हणतो,”हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर…”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More