Petrol-Diesel Price | महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच इंधनदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होणार, अशी चर्चा आहे. (Petrol-Diesel Price)
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत असल्याचं चित्र आहे. मात्र, भारतात अजूनही पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात प्रति पिंप 70 डॉलरच्या खाली घसरले आहे. डिसेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच तेलाच्या दरात इतकी घसरण झाली.
इंधनदरात कपात होणार?
लोकसभा निवडणुकीदरम्यान इंधनदरात काही अंशी कपात झाली होती. या व्यतिरिक्त गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंधनदरात कपात होईल की नाही?, असे प्रश्न केले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. (Petrol-Diesel Price)
या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळू शकते.
राज्यात आजचे इंधनदर
भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. ही गरज भागवण्यासाठी भारताला 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत भारत आता कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Petrol-Diesel Price)
दरम्यान, महाराष्ट्रात आज 20 सप्टेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेलची सरासरी किंमत 91.31 रुपये प्रतिलिटर आहे. आता सर्वसामान्यांना इंधनदरात दिलासा मिळणार का, हे आगामी काळात दिसून येईलच.
News Title : Petrol-Diesel Price May Decrease Before Assembly Elections
महत्वाच्या बातम्या-
प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; ‘या’ राशींचे येणार अच्छे दिन
“अजित पवार गटाच्या पेजनं अश्लिल पेजला फॅालो केलं”, शरद पवार गटाच्या दाव्याने खळबळ
“लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या”; सलमान खानच्या वडिलांना का दिली धमकी
बिग बॉसमध्ये निक्की-संग्रामची मैत्री होणार; अरबाजाचं काय?
कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा