पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदललं?, वाचा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर
नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 113 डॉलरवर जाऊन पोहोचले असताना देशात तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जारी करण्यात आले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणतेही बदल झाले नाहीत. 22 मार्चनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात उच्चांकी वाढ झाल्यानंतर 6 एप्रिलपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
राजधानी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 105.41 रूपये व प्रतिलीटर डिझेलचे दर 96.67 रूपये आहेत. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी120.51 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी 104.77 रूपये मोजावे लागत आहेत. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत असून पेट्रोलची किंमत 123.51 रूपये तर डिझेलची किंमत 106 रूपये आहे.
दरम्यान, पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 120.20 रूपये व 104.50 रूपये आहे. नागपूर शहरात पेट्रोलचे दर 120.40 रूपये असून प्रतिलीटर डिझेलसाठी 103.73 रूपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत 121.30 रूपये व डिझेलची किंमत 104.50 रूपये आहेत. सलग एक महिना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून…’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ
“राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं”
‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका
“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”
“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही”
Comments are closed.