बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर, वाचा आजचे दर

नवी दिल्ली | देशात महागाई गगनाला भिडली असताना इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price) दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

तब्बल साडेचार महिने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणतीही वाढ झाली नसताना तेल कंपन्यांकडून आजचे ताजे दर जारी करण्यात आले आहेत.

आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असून त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलसाठी 120.51 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी 104.77 रूपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi) प्रतिलीटर पेट्रोलचे दर 105.41 रूपये तर प्रतिलीटर डिझेलचे दर 96.37 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

दरम्यान, मुंबई, दिल्लीसह सर्व महत्त्वाच्या शहरात इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायाला मिळत आहे. 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आज सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता भाग सोमय्या भाग चित्रपट काढावा”; राऊतांचा खोचक टोला

“पन्नास लाखांच्या घड्याळात ज्यांचं टायमिंग चुकलं ते आता…”

“ठाकरे सरकार हे जगातील सर्वात भ्रष्ट सरकार, शरद पवारांच्या…”

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली

किरीट सोमय्यांना अटक होणार?; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More