तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 113 डॉलर प्रतिबॅरल असून देशात तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी करण्यात आले आहेत.
आज सलग 36व्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 22 मार्च नंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलीटरमागे जवळपास 10 रूपयांनी वाढल्यानंतर 6 एप्रिल पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
राजधानी दिल्लीत आजही प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 105.41 रूपये आणि 96.67 रूपये मोजावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत 120.51 रूपये असून डिझेलची किंमत 104.77 रूपये आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात आहे. परभणीत 1 लिटर पेट्रोलसाठी 123.51 रूपये व डिझेलसाठी 106 रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 120.40 रूपये व डिझेलची किंमत 103.73 रूपये आहे. पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे 120.20 रूपये व 104.50 रूपये आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलचे दर 121.30 रूपये व डिझेलचे दर 104.50 रूपये आहेत. गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर असल्याने सर्वसामान्यांना तुर्तास दिसाला मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन
‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल
रुग्णालयातील फोटोंवरुन नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, पहिला गुन्हा दाखल
“नवनीत राणा या रुग्ण नाहीत तर मनोरुग्ण झाल्या आहेत”
असानी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ भागावर परिणाम, हवामान विभागाचा गंभीर इशारा
Comments are closed.