पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तब्बल साडेचार महिने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर 22 मार्चपासून इंधनाच्या दरात तब्बल 14 वेळेस वाढ झाली होती. इंधनाच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर 6 एप्रिलपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.
आज सलग 9व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रूपयांवर तर डिझेलचे दर 96.67 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 120.51 रूपये तर डिझेलचे दर 104.77 रूपये आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 रूपये तर डिझेल 104.40 रूपये, पुण्यात पेट्रोल व डिझेल अनुक्रमे 120.30 व 104.30 रूपये, कोल्हापूरात पेट्रोल 120.11 रूपये व डिझेल 102.82 रूपये, नागपुरात प्रतिलीटर पेट्रोल 120.15 तर डिझेल 102.89 रूपये दराने विकलं जात आहे. गेल्या 9 दिवस इंधनाच्या दरात वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
युक्रेनसाठी ‘या’ देशांनी घेतला मोठा निर्णय, उचललं महत्त्वाचं पाऊल
आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…
“संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा…”; भाजपचा राऊतांना थेट इशारा
CISF जवानांनी वाचवले तरूणीचे प्राण, झालं असं की…; पाहा व्हिडीओ
राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम! गृहमंत्री वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.