बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे दर

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत होती. परिणामी भारतात इंधनाचे दरात सातत्याने वाढ होत होती. तब्बल साडेचार महिने पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर राहिल्यानंतर 22 मार्चपासून त्यांच्या दरात कमालीची वाढ झाली.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असताना गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. तेल कंपन्यांकडून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जारी करण्यात आले असून त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

इंधनाचे दर सध्या स्थिर असून मुंबईत (Mumbai) प्रतिलीटर पेट्रोलचे दर 120.51 रूपये व प्रतिलीटर डिझेलचे दर 104.77 रूपये आहेत. पुण्यात (Pune) पेट्रोलसाठी 120.30 रूपये तर डिझेलसाठी 104.30 रूपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोलचे दर 105.41 रूपये तर डिझेलचे दर 96.67 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

दरम्यान, 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज सलग 9व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख नीतू कपूरने केली जाहीर, पाहा व्हिडीओ

धनंजय मुंडेंचा रूग्णालयातील पहिला फोटो समोर, पाहा फोटो

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारने दिला मोठा दिलासा

“…तर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

“खरे मास्टरमाईंड तर उद्धव ठाकरे”; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More