कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले
नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी एकदा वाढ झाली असून संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी करण्यात आले असून आज 37 दिवसांनंतरही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही देशात 6 एप्रिलपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
राजधानी दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचे दर 105.41 रूपये आणि डिझेलचे दर 96.67 रूपये आहेत. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलची किंमत 120.51 रूपये असून डिझेलची किंमत 104.77 रूपये आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आजही परभणी जिल्ह्यात मिळत आहे. परभणीत पेट्रोलसाठी 123.51 रूपये व डिझेलसाठी 106 रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे 120.20 रूपये व 104.50 रूपये आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 120.40 रूपये असून डिझेलची किंमत 103.73 रूपये आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलसाठी 121.30 रूपये व डिझेलसाठी 104.50 रूपये मोजावे लागत आहेत.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, शरद पवारांवरील टीका अंगलट
‘हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने मारून…’; पवारांवरील आक्षेपार्ह टीकेनंतर रूपाली ठोंबरे आक्रमक
‘तू तर लबाडांचा लबाड…’; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर टीका, वादग्रस्त पोस्ट चर्चेत
27 मे रोजी ‘या’ भागात मान्सूनचं आगमन, हवामान खात्याचा इशारा
महत्त्वाची बातमी ! डी गँग संदर्भात NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा
Comments are closed.