पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर
नवी दिल्ली | 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत होती. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात जवळपास प्रतिलीटरमागे 10 रूपयांची वाढ झाल्यानंतर 6 एप्रिलपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले असून आज सलग 30 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. इंधनाचे दर आजही स्थिर पाहायला मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजधानी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचे भाव 105.41 रूपये तर प्रतिलीटर डिझेलचे भाव 96.67 रूपये आहेत. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलमागे 120.51 रूपये तर प्रतिलीटर डिझेलमागे 105.41 रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 120.20 रूपये आणि 103.10 रूपये आहेत. नागपूर शहरात पेट्रोलचे दर 120.40 रूपये तर डिझेलचे दर 103.73 रूपये आहेत. औरंगाबादमध्ये आज प्रतिलीटर पेट्रोल व डिझेलसाठी अनुक्रमे 121.13 रूपये व 103.79 रूपये मोजावे लागत आहेत. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत असून पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 123.51 व 106 रूपये प्रतिलीटर आहेत.
थोडक्यात बातम्या-
Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘जबरदस्तीने ओरल सेक्स करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्यावर एक्स वाईफचा गंभीर आरोप
दिलासा मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्यांच्या अडचणी कायम!
“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला नवं वळण, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Comments are closed.