मुंबई | देशात महागाई गगनाला भिडलेल्याने आधीच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. साडेचार महिने स्थिर असलेल्या इंधनाच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे.
गेल्या 16 दिवसांत तब्बल 14 वेळेसे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. 22 मार्चपासून प्रतिलीटर पेट्रोलच्या दरात 10.20 रूपयांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांकडून आज इंधनाचे दर जारी करण्यात आले असून आज सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी देखील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत असताना मुंबईत (Mumbai) मात्र पेट्रोलने उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी तब्बल 120.51 रूपये तर डिझेलसाठी 104.77 रूपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीत (New Delhi) पेट्रोल 105.41 तर डिझेल 96.67 रूपयांवर जाऊन पोहोचलं आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रतिबॅरल असूनही भारतात सातत्याने इंधनाचे दर वाढलेले पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
“शरद पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”
‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल; गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात
सिल्वर ओकवरील घटनेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Comments are closed.