कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जारी करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 113 डॉलरवर जाऊन पोहोचले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना देशात मात्र आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात 6 एप्रिल नंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
राजधानी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 105.41 रूपये तर डिझेलचे दर 96.67 रूपये आहेत. मुंबईत आज प्रतिलीटर पेट्रोलसाठी 120.51 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी 104.77 रूपये मोजावे लागत आहेत. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत असून प्रतिलीटर पेट्रोल 123.51 रूपये व डिझेल 106 रूपयांना मिळत आहे.
दरम्यान, पुण्यात प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 120.20 रूपये व 103.10 रूपये आहेत. नागपूर शहरात पेट्रोलसाठी 120.40 व डिझेलसाठी 103.73 रूपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 121.30 रूपये व 104.50 रूपये आहे. गेल्या महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
“…तर मी 14 दिवसच काय, 14 वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार”
“मी उद्धव ठाकरेंन आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर…”
कृष्णप्रकाश यांच्या अडचणीत वाढ?; दुसऱ्या लेटरबॉम्बने पोलीस दलात खळबळ
IPL पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, एका खेळाडूमुळे ‘ही’ संपूर्ण टीमच आयसोलेशनमध्ये
Comments are closed.