मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) थेट फटका आंततरराष्ट्रीय बाजाराला बसला आहे. अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Hike) वाढ झाल्याने नागरिकांना मोठा झटका बसला आहे.
सकाळी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा 80 पैशांनी वाढ झाली आहे. दरवाढीनंतर 2 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर मिळतंय.
मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. तसेच दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचली आहे.
दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यात तब्बल साडेचार महिन्यांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात वाढ, वाचा ताजे दर
मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू
Gudi Padwa 2022 : 2 वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त गुढीपाडवा
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
“राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी….”
Comments are closed.