Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 29 जून रोजीचे इंधनदर सुधारले आहेत.काल (28 जून रोजी) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी वाहन चालकांना मोठा दिलासा दिलाय. अजित पवारांनी इंधन दरात (Petrol-Diesel Price Today ) घट करण्यात आल्याची घोषणा केलीये.
‘या’ तीन शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त
अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आलीये. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात आलाय. यामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटरने कमी झाले आहेत. त्यामुळे फक्त या तीन शहरांमध्येच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले आहेत.
राज्यात 1 जूनरोजी पेट्रोलची किंमत 104.86 रुपये प्रति लिटरपासून (Petrol-Diesel Price Today ) सुरू झाली.आज 29 जून रोजी महाराष्ट्रातील पेट्रोलची किंमत 0.22 टक्क्यांनी कमी होऊन 104.79 रुपये प्रति लिटर झाली आहे. मुंबईत आज डिझेल 89.95 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.
मेट्रो सिटीमधील इंधनदर
दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.76 तर डिझेल 87.66
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 104.43 तर डिझेल 89.95
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 103.93 तर डिझेल 90.74
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.73 तर डिझेल 92.32
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 102.82 तर डिझेल 88.92
News Title- Petrol-Diesel Price Today 29 June 2024
महत्वाच्या बातम्या-
ग्राहकांना झटका! महिन्याच्या शेवटी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर
सावधान! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट जारी
पुण्यातील ‘या’ भागात घडली धक्कादायक घटना! 14 वर्षांच्या मुलानं अनेकांना टँकरनं उडवलं
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे
1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड