Petrol-Diesel Price Today | आज 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल. त्यापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन सरकार स्थापन होण्याआधी पेट्रोल-डिझेलचे दर समोर आले आहेत.
आज 4 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतेच बदल झालेले नाहीत. मात्र, 4 जून हा मोठा दिवस असून लवकरच नव्या सरकारची घोषणा होणार आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांना चांगली बातमी मिळू शकते, याची शक्यता आहे.
14 मार्चरोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले होते. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपयांनी घसरले होते. आता निकाल लागल्यानंतर नवीन सरकार इंधनदरात घसरण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसं पाहायला गेलं तर, राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
Petrol-Diesel Price Today Maharashtra
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.85 रुपये प्रतिलिटर आहे. काल, 3 जून रोजी राज्यात पेट्रोलचे दर समान होते. म्हणजेच कालपासून महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.94 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.09 टक्क्यांनी कमी झाली आहे.
तर, महाराष्ट्रात आज डिझेलची सरासरी किंमत ही 91.45 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आता किंमत 0.12 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या 10 दिवसांत (Petrol-Diesel Price Today) महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत 91.45 रुपये प्रति लिटर झाली आहे.
मेट्रो सिटीमधील इंधनदर
दिल्ली पेट्रोल 94.72 रुपये तर डिझेल 87.62 प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोल 104.21 रुपये तर डिझेल 92.15 प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 103.94 रुपये तर डिझेल 90.76 प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 100.75 रुपये तर डिझेल 92.32 प्रतिलिटर आहे.
बंगलोर पेट्रोल 99.84 रुपये तर डिझेल 85.93 प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 94.65 रुपये तर डिझेल 87.76 प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 94.83 रुपये तर डिझेल 87.96 प्रतिलिटर आहे.
News Title- Petrol-Diesel Price Today 4 June 2024
महत्वाच्या बातम्या-
सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!
लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का!
निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ST महामंडळात ‘इतक्या’ पदांची भरती सुरू
Heat Stroke ते अॅसिडिटीपासून ‘या’ समस्यांवर लाभदायक आहे जलजीरा; जाणून घ्या रेसिपी